Nov 30, 2015

Announcing InPO 2016 (Marathi News Brief)

नमस्कार !

मी, केदार सोनी, एक शाळा संचालक असून, गेले ८ वर्षांपासून एक उपक्रम राबवत आहे आणि ही माहिती ह्या उपक्रमाला विविध माध्यमातून भारतीय तरुण शाळकरी मुलांपर्यंत पोहोचाव्ण्याकरिता आहे. इंडिअन फिलोसोफी ओल्य्म्पीयाड (InPO) हि चळवळ ९वि ते १२वि च्या मुलांना आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान स्पर्धेत (IPO) उतरवण्याची पहिली पायरी आहे. हि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गेले २३ वर्षे चालत असून, त्यात ४० पेक्षा जास्त देश सहभाग घेतात व त्याला UNESCO ची स्पॉन्सर्शिप देखील आहे. ह्या स्पर्धेचे लक्ष्य विद्यार्थ्यांमध्ये तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे  व तरुण पिढीला आजच्या जगातील किचकट आणि गंभीर प्रश्णांचा विचार, आणि जमल्यास उपाय, करण्याची मानसिकता देणे असा आहे.

ह्याकरिता तत्वज्ञानाची सखोल माहिती असणे तितकेसे गरजेचे नाही पण तर्कशुद्ध विचार क्षमता आणि सारासार विचार करण्याची सवय आवश्यक आहे. ह्या उद्धीष्टांनी भारतामध्ये ही चळवळ रुजव्ण्याकरिता गेले ८ वर्ष माझा प्रयास चालू आहे. सुरुवात माझ्या शाळेच्या २ विद्यार्थिनींनी झाली व हळू हळू दर वर्षी देशातील जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांचा सहभाग होऊ लागला. InPO मधील पहिल्या फेरीत मुलांची तर्क व भाषा प्रभुत्व य्हाची चाचणी होते. ही फेरी online असून हे प्रश्न ३-४ दिवस इंटरनेट वर जाहीर केले जातात. य्हाचे कारण असे कि मुलांना त्यांच्या अभ्यास व क्लास्सेसच्या चक्रातून वेळ काढून हे करता यावे. इथे उत्तरे इंटरनेट वरून किंवा कोणाला विचारून शोधता येत नाहीत, कारण प्रश्ण नुसत्या माहितीवर आधारित नसून गंभीर विचार करून स्वतःचे मत मांडावे लागेल असे अस्तत.

पहिल्या फेरीतून साधारण १०% मुलांना दुसर्या फेरीत नेले जाते येथे त्यांना IPO प्रमाणे ४ वेगवेगळ्या विचारवंतांची वक्तव्ये दिली जातात. त्यांना त्यापैकी एकावर आपला विचार लेख-स्वरुपात मांडायचा असतो. हे लेख शाळेच्या सामान्य लेखनापेक्षा वेगळे असे कि त्यात त्या विचारवंताच्या बाजूने किंवा त्याच्या विरुद्ध तर्क व पुरावा मांडायचा असतो. २०१६ च्या InPO मध्ये मी आणि माझी साथ देणारे माजी विद्यार्थी एक नवीन प्रयोग करू पाहतोय. दुसर्या फेरीत नुस्त लेख लिहिण्या ऐवजी, निवडलेल्या मुलांशी ब्लॉगच्या माध्यमातून काही दिवस चर्चा केली जाईल व प्रत्येकाला एखाद्या मुद्यावर आपला वाद इतरांसोबत मांडावा लागेल. अश्या चर्चेतून सगळ्यात समर्थ युक्तिवाद मांडणाऱ्या २ मुलांना भारताच्या वतीने IPO मध्ये शामिल होण्यास निमंत्रण दिले जाईल.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा दर वर्षी वेगवेगळ्या देशात होत अस्ते. २०१४ साली Lithuania तर २०१५ साली Estonia येथे हि स्पर्धा झाली. येत्या वर्षी हि बेल्जियम च्या घेण्ट ह्या शहरात होणार आहे (http://www.ipo2016.be). हि स्पर्धा दर वर्षी May महिन्यात ४ दिवस चालत असून, २ शिस्क्षक व २ विद्यार्थी य्हांचा सर्व खर्च यजमान देश करीत असतो. भारतातील ह्या चळवळीला कोणाचे आर्थिक सहाय्य नसल्याने प्रवासखर्च प्रत्येकाला स्वतः करावा लागतो. भारतीय संघाची तयारी करून घेण्यास किंवा InPO च्या कोणत्याही फेरीस बसण्यास फी आकारली जात नाही. हे काम मी आणि माझी माजी विद्यार्थिनी पूजा बिलीमोग्गा स्वेच्छेने करितो. पूजा २००९ साली फिनलंड मध्ये स्पर्धक म्हणून तर २०१४ ला शिक्षिका म्हणून सहभागी झाली होती.

IPO मध्ये भारताला आजपर्यंत ४ सिल्व्हर, १ ब्राँझ व ३ हॉनेरेब्ल मेन्शन मिळाले आहेत. २०१६ च्या संघाची निवड करण्याची पहिली फेरी १९ डिसेंबर २०१५ ला सुरु होईल व त्याचा पेपर आमच्या संकेत स्थळावर असून, २१ डिसेंबर पर्यंत त्याची उत्तर्ण्याची मुदत राहील. ह्या काळात भारतातील ९वि ते १२वि ह्या वर्गातील कोणत्याही बोर्डातील व कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रविष्ट होऊ शकतो. ह्याची संपूर्ण माहिती आमच्या ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे - http://philo.abhinav.ac.in/InPO.htm. नोंदणीकरिता ह्या लीन्क्वरचा फोर्म भरावा  - http://philo.abhinav.ac.in/Enrollments.htm.

For article about last year's Olympiad please read our post 
For past training assignments see our posts.